जालना : राज्य शासनाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने बौद्ध्वासी दशरथरावजी व्यायाम व क्रीडामंडळ या संस्थेला सामाजिक न्याय मंत्रालयाचे सचिव सुमंत भांगे व आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देउन नुकतेच मुंबई आयोजित एका कार्यक्रमात गौरविण्यात आले आहे. प्रमाणपत्र व रोख २५ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
जालना शहरात बौद्ध्वासी दशरथरावजी व्यायाम व क्रीडामंडळाच्या वतीने गेल्या २२ वर्षांपासून ४३ रक्तदान शिबिरे, वस्त्रदान, अन्नदान, कोरोना काळात केलेली मदत व विविध समाजपयोगी कार्यक्रम राबविण्यात आले आहेत. या कामांची दखल घेउन मुख्यमंत्री एकनाथ श्िांदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र पडण्ावीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडामंत्री संजय बनसाेडे, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्या प्रमुख्ा उपस्थितीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न आण्णा भाउ साठे यांच्या नावाने प्रतिष्ठीत असलेला समाजभूषण्ा पुरस्कार देउन गौरविण््यात आले. राज्यातील एकूण्ा ३९६ पुरस्कारांचे विविध्ा सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्था व सामाजिक कार्यकत्त्र्यांचा गाैरव करण््यात आला. यावेळी सचिव सुमंत भांगे, आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर सुरडकर, त्रिशा सुरडकर, मालती गायकवाड, अशोक गायकवाड, पद्माबाई सुरडकर यांना प्रमाणपत्र व प्रशस्तीपत्र देण्यात आले. सहाय्यक आयुक्त प्रदीप भाेगले, अतिक ससाने, सुनगत, भीम गायकवाड, सरपंच सुभाष डिघे, प्रकाश्ा भोरे, विनायक उन्हाळे, प्रवीण कोल्हे, अनिता भारसाखळे, स्मीता साळवे, सुमन पाईकडे, सीमा सुरडकर आदींनी स्वागत केले अाहे.