कुंभारी:- दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथे महात्मा बसवेश्वर चौकात वीरशैव लिंगायत धर्माचे संस्थापक तसेच धर्मगुरू क्रांतीसुर्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांची ८९४ वी जयंती साजरी करण्यात आली. समाजात समानता, न्याय,बंधुता आधी मूल्ये रुजविण्यात महात्मा बसवेश्वर यांचे योगदान खूप मोठे आहे. सर्व जाती धर्मातील लोकांना त्यांनी समानतेची, प्रेमाची, बंधुत्वाची शिकवण दिली.
बसवेश्वर चौकात लिंगायत समाजाच्या वतीने बसवेश्वर महाराजांच्या मूर्तीचे पूजन व पुष्पहार वळसंग पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अनिल सनगल्ले, उद्योजक गजानन होनराव, नागनाथ कटारे यांच्या हस्ते अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रकाश करपे, संकेत पारशेट्टी, यशवंत कटारे, चंद्रकांत मळेवाडी, सचिन झगळघंटे, बाबुशा चांगले, स्वप्निल थोंटे, शिवलिंग पारशेट्टी, सिद्धाराम चांगले, गणेश चांगले आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.