भुमी अभिलेख कार्यालयातील अधिकार्यांना हाताशी धरुन काही लोक जालना शहरातील मंठा रोडवरील गट क्र. 554 मधील मालकी हक्काची प्रॉपर्टी हडप करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा गंभीर आरोप व्यापारी अंकित आबड यांनी गुरुवार दि. 6 जून 2024 रोजी दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात केला. या प्रकरणी त्यांनी तालुका जालना पोलीस ठाण्यात तक्रार देखील केलीय.
मंठा रोड वरील गट क्र. 554 मध्ये अंकित आबड यांची मालमत्ता असल्याचं त्यांचं म्हणनं असून त्या मालकी हक्काची मालमत्ता हडपण्यासाठी भुमी अभिलेख कार्यालयातील अधिकार्यांना हाताशी धरुन बोगस पीआर कार्ड तयार केले जात असल्याचंही आबड यांनी म्हटलंय. शिवाय जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करुन त्यांनी तालुका जालना पोलीस ठाण्यात तक्रार करुन गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील केलीय.