कुंभारी:- दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथे विजेच्या कडकडासह पाऊस पडला होता. सायंकाळी साडेचार च्या दरम्यान कल्लूर येथे कार्यक्रम करून कुंभारी येथे येत असताना अक्कलकोट रोड वरती सुरभी नगर येथे बिळेणी नागप्पा डक्के ( वय 47 ) राहणार कुंभारी याच्या अंगावर वीज पडून त्याचा मृत्यू झाला.
यावेळी सोलापूर वळसंग रोडवरील टोल नाक्यावरील कर्मचारी श्रीशैल माळी यांनी ॲम्बुलन्समधून कुंभारी येथील अश्विनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले
सदर घटनेची माहिती मिळताच कुंभारीचे तलाठी भीमाशंकर भुरले, कोतवाल गुरुदेवी जवळे सरपंच श्रुती निकंबे आदींनी भेट देऊन शासनाकडून मदत देण्याची ग्वाही दिली