जालना तालुक्यातील रेवगाव येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात दि. 7 जून 2024 रोजी सकाळी 10 वाजता वृक्षारोपण करण्यात आलं. यावेळी गावातील तरुणांनी पर्यावरस संवंर्धनासाठी एक पाऊल पुढे टाकलं असून पुर्ण गावातच वृक्ष लागवड करण्याचा संकल्प त्यांनी केलाय. या वर्षी जालना जिल्ह्यातील रेवगाव येथे पहिल्यांदाच घर तिथे वृक्ष उपक्रम राबविणार असल्याचं तरुणांनी सांगीतलंय.
यावेळी गावचे सरपंच आण्णा गोल्डे, तंटामुक्ती अध्यक्ष रघुनाथ गोल्डे, ग्रामपंचायत सदस्य भरत मोरे, संतोष शिंदे, भागवत शेळके, बाळू मोरे यांच्यासह तरुणांची उपस्थिती होती.