जालना तालुक्यातील सिंदीकाळेगाव येथून सुसाट वेगाने दुचाकी चालवित आलेल्या दोन संशयीतांना चौधरी नगर परिसरात कारवाई करुन दोघांना ताब्यात घेतलं असून त्यांच्या ताब्यातून सुमारे 7 मोबाईल जप्त करण्यात आलेत. ही कारवाई दि. 6 जून 2024 रोजी रात्री 8 वाजता करण्यात आली असल्याची माहिती शुक्रवार दि. 7 जून 2024 रोजी पोलीस सुत्रांनी दिलीय.
तालुका जालना पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार मानसिंग पापासिंग बावरे यांनी सरकार पक्षातर्फे फिर्याद दिली असून त्यांनी दि.06 जून 2024 रोजी चौधरी नगर परिसरात अंधाराच्या आडोशाला ओळख लपवून बसलेल्या रुद्र मारुती टाके आणि राजु अशोक वाघमारे दोघे रा. नांदेड यांनी पोलीसांना पाहुन पळ काढला. त्यामुळे पोलीसांनीही त्यांचा पाठलाग करुन ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांच्याजवळ वेगवेगळ्या कंपनीचे सात मोबाईल मिळुन आले. पोलीसांनी मोबाईल बाबत विचारले असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्यांच्यावर तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून 1 झावमी कंपनीचा व रेडमी कंपनीचे 5 तर ओपो कंपनीचा 1 मोबाईल जप्त करण्यात आलाय.