जालना शहराला पाणी पुरवठा करणार्या पाईपलाईनला काजळा फाटो येथे मोठ्या प्रमाणा गळती लागल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते संतोष चाळसे यांनी शुक्रवार दि. 7 जून 2024 रोजी सकाळी 11 वाजता जालना महानगर पालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांना निवेदन देत गळती बंद करण्याची मागणी केलीय.
जालना शहरात पिण्याच्या पाण्याची भिषण टंचाई असतांना जालना महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील अधिकार्यांच्या हलगर्जीपणामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. ज्या ठिकाणी गळती लागते, त्या ठिकाणची माहिती संबंधीत अधिकार्यांना दिली जाते. परंतु, त्याची दुरुस्ती करण्यास पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी टाळाटाळ करतात. त्यामुळे जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी टंचाईचा सामना करावा लागतो. काजळा फाटा येथे मागील आठवड्यापासून पाईपलाईनला गळती लागली. परंतु, त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. सदरील दुरुस्ती तात्काळ करावी अन्यथा तिव्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा संतोष चाळसे यांनी दिलाय.