जालना : जालना जिल्ह्यात सुरु असलेली खूनाची मालीका थांबता थांबेना झालीय. त्यामुळे लोकांच्या मनात भितीचं वातावरण निर्माण झालंय. दि. 8 जुलै 2024 रोजी मियासाब दर्गा परिसरात तरुणाची हत्या करून फरार झालेल्या आरोपीची बुधवार दि. 10 जुलै 2024 रेाजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास दिवसा ढवळ्या खून केल्याची घटना घडली. खून का बदला खून च्या घटनेमुळे जालना हादरुन गेलंय. जालना शहरातील रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाजवळ ही घटना घडली. काही लोकांनी खून होत असतांनाचे चित्रीकरणही केलंय. त्याचा विडीओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल झालाय.
जालना शहरातील शेख समीर शेख जमील या तरुणाची सोमवारी सायंकाळी मियासाहेब दर्गा परिसरात भोसकून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात ज्या व्यक्तीवर हत्तेचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या तरुणाची आज भर दुपारी हत्या करण्यात आली आहे. खुसरुद्दीन शेख असं मयत संशयित आरोपीचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली. विशेष म्हणजे पोलीस या तरुणाच्या मागावर असतानाच ही हत्या करण्यात आल्याने चर्चेला उधान आलंय. या घटनेची माहिती कळताच कदिम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने, स्थानिक गुन्हे शाखेचे रामेश्वर खनाळ, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष्य नोपानी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीसांनी हत्या झालेल्या संशयीत आरोपीला उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलंय. दरम्यान दोन तासाच्या आतच दोन संशयीत आरोपींना पोलिसांनी पाठलाग करुन जेरबंद केलंय.