जालना जिल्ह्यात दि. 18 जुलै हा दिवस अपघाताचा दिवस ठरला. एका पाठोपाठ एक अपघात घडल्यानंतर गुरुवार दि. 18 जुलै 2024 ते शुक्रवार 19 जुलै 2024 च्या मध्यरात्री 12.15 वाजता पुन्हा पिर पिंपळगाव येथे भिषण आघात झाला. या अपघातात एक स्कार्पीओ रोडवर उभा असलेल्या ट्रकला धडकली. यात 3 जण जमखी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आलंय.
पीएसआय निकम, पोलीस कर्मचारी कदम, दाभाडे हे डावरगाव शिवारातील अपघाताची कार्यवाही पूर्ण करून जालना शहराकडे येत असतांना पिर पिंपळगाव पाटीजवळ एक स्कार्पीओ क्र. एम.एम.14 ई.पी. 7948 ही गाडी रोडवर उभा असलेल्या ट्रक क्र. एम.एच.18 बीजी 3197 ला पाठीमागून जोराची धडक दिलेल्या दिसून आलं. हा अपघात वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झाल्याचं सांगण्यात आलंय. या अपघातात कार चालक संदीप विष्णू वीर, ऋषींनाथ दंडगळ आणि अशोक कौतिकराव वीर तिघे रा. बावणेपांगरी जखमी झालेत. या अपघातात जखमी झालेल्यांना जालना येथील रुग्णालयात हलविण्यात आलंय. रस्त्यावरी अपघातग्रस्त वाहने बाजुल करुन वाहतुक सुरळीत करण्यात आलीय.
या आधी डावरगाव शिवारात झालेल्या अपघातात संदीप गुलाबराव साबळे हा मयत झाला होता तर राजू बाबुराव साबळे व दीपक प्रल्हाद लहुळकर हे दोघे जखमी झाले होते. हा अपघात घडण्यापुर्वी देखील राजुर रोडवर काळी पिवळी टॅक्सी एका विहीरीत पडल्याने 7 भावीकांचा मृत्यु झाला होता. जालना जिल्ह्यात झालेल्या या अपघात सत्रामुळे जालना जिल्ह्यासाठी हा दिवस अपघाताचा दिवस ठरला. त्यामुळे जिल्हाभरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.