केंद्रात पहिल्यांदाच केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री तथा आयुष्य मंत्री पदाचा पदभार स्विकारल्यानंतर प्रतापराव जाधव यांनी शुक्रवार दि. 19 जुलै 2024 रोजी सकाळी 8 वाजता जालना जिल्हा दौरा सुरु केला. दरम्यान जालना रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री तथा आयुष मंत्री प्रतापराव जाधव हे आज रेल्वेने जालना रेल्वे स्थानकावर आले होते. दरम्यान त्यांचं जिल्हा प्रशासनाच्या वतीने देखील स्वागत करण्यात आलं. त्यानंतर अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक राजेंद्र गाडेकर यांच्याकडून त्यांनी रुग्णालयाचा आढावा घेतला. यावेळी डॉ. उमेश जाधव, मनोज जाधव, डॉ. पाल, जिल्हा महिला रुग्णालयाचे अविनाश जाधव, सचिन उगले, देवकर आदी उपस्थित होते.