जालना तालुक्यातील मौजपुरी आणि रामनगर येथील दलित वस्तीच्या विकास कामाच्या प्रमा या जिल्हा परिषदेमधून दिल्या जात नाहीत. त्यामुळे गावातील दलित वस्तीचा विकास खोळंबलाय. त्यामुळे या प्रमा तात्काळ उपलब्ध करुन देण्यात याव्यात अशी मागणी मौजपुरीचे सरपंच बद्रीनारायण भसांडे आणि रामनगर चे सरपंच अॅड. गोपाल मोरे यांनी केलीय. या संदर्भात शुक्रवार दि. 19 जुलै 2024 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकार्यांना निवेदन देखील देण्यात आलंय.
ग्रामपंचायतने कृती आराखड्यानुसार दलीत वस्ती सुधार योजने अंतर्गत काम मंजुरीसाठी गटविकास अधिकारी यांच्याकडे रितसर प्रस्ताव पाठविला होता. सदरील कामांना मंजुरी मिळाली असून त्याच्या प्रमा मात्र दिल्या जात नाहीत. त्यामुळे दलित वस्तीची विकास कामे होत नाहीत. सदरील दलित वस्तीच्या प्रमा देण्यास विलंब करुन दलित वस्त्यांना विकासापासून दुर ठेवण्यात येऊ नये अशी मागणीही सरपंच बद्रीनारायण भसांडे आणि अॅड. गोपाल मोरे यांनी निवेदनाच्या माध्यमातून केलीय.