मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दि. 18 जुलै 2024 रोजी रात्री उशिरा अपघातग्रस्त वारकर्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मयत वारकर्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यासह घरातील सदस्याला सरकारी नोकरी देण्याची देखील मागणी केलीय.
जालना राजूर रोडवर तूपेवाडी फाट्याजवळ चारचाकी काळी पिवळी गाडी विहिरीत पडून 7 वारकर्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर 6 जखमींवर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहीती मिळताच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जखमींची रात्री उशीराने रुग्णालयात जावून भेट घेतली असून जखमींची विचारपूस केलीय. तसेच मृतांच्या नातेवाईकाला सरकारने जाहीर केलेली मदत तात्काळ मिळावी व त्यांच्या कुटुंबांतील एका सदस्याला सरकारी नोकरी मिळावी अशी मागणी मनोज जरांगे यांनी केलीय.