जालना ते राजूर रोडवरील तूपेवाडी फाट्याजवळ काळी पिवळी गाडी विहिरीत कासळून 7 वारकर्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. त्यामुळे माझा वाढदिवस साजरा न करता वाढदिवसानिमित्त आयोजन सर्व कार्यक्रम रद्द करण्यात येत असल्याची माहिती खासदार डॉ. कल्याण काळे यांनी दिलीय. शुक्रवार दि. 19 जुलै 2024 रोजी सकाळीच 9 वाजता एक विडीओच्या माध्यमातून ही माहिती दिलीय. तसेच वारकर्यांच्या दुखःत सहभागी असून जिल्ह्यावर ही शोकळला पसरल्याचं दुखही त्यांनी व्यक्त केलंय.
या अपघातात बदनापूर तालुक्यातील चनेगाव येथील 2, तपोवन येथील 1 आणि जाफराबाद तालुक्यातील 1 अशा 7 वारकर्यांवर काळाने घाला घातला. त्यांची गाडी विहीरीत कोसळल्याने जिल्ह्यावर शोककळा पसरलीय. त्यामुळे जालना लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. कल्याण काळे यांनी वाढविस साजरा न करण्याचा निर्णय घेतला असून कोणत्याही कार्यकर्त्यांनी वाढदिवस साजरा करु नये असं आवाहन केलंय. शिवाय वाढदिवसानिमित्त आयोजित सर्व कार्यक्रम देखील रद्द करण्यात आलेत.