कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड गजापूर येथे मज्जित दर्गा आणि कुराणची विटंबना केल्याची घटना घडली होती. या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवार दि. 19 जुलै 2024 रोजी दुपारी 3 वाजता जालन्यात मुस्लिम समाजाने धरणे आंदोलन केलं. जालना शहरातील लतीफ शहा बाजार चौकात हे आंदोलन करण्यात आलं.
कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड, गजापूर येथे मज्जित दर्गा आणि पवित्र कुराणाची विटंबना केल्याच्या घटना घडल्यात. या घटनेचा देशभरातून मुस्लिम समाजाकडून निषेध करण्यात येतोय. जालना शहरातील लतीफ शहा बाजार चौकात मुस्लिम समाजाच्या वतीने शेकडोंच्या संख्येने एकत्रित येत, या घटनेचा निषेध केला. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात मुस्लिम समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आलं.