कोल्हापुरातील विशाळगड गजापुर येथील जामा मस्जिदीवर हल्ला करुन तोडफोड केल्याने तसचे पवित्र कुरानची विटंबना केल्याने जालना येथील मुस्लीम वकीलांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री, राज्यपाल यांना शुक्रवार दि. 19 जुलै 2024 रोजी दुपारी 3 वाजता निवेदन देण्यात आलंय.
दि.14 जुलै 2024 रोजी कोल्हापुर येथील विशाळगड गजापुर येथे जामा मस्जिदीवर हल्ला करुन तोडफोड करण्यात आली होती. दरम्यान या घटनेचा राज्यभरात निषेध व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेत मुस्लीम समाजात पवित्र मानल्या जाणार्या कुरानची देखील विटंबना झाल्याचं निवेदनात म्हटलंय. सदरील घटनेची केंद्रीय अन्वेशन ब्युरो मार्फत चौकशी करण्यात यावी. व समाज कंटकावर कडक करावाई करावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली. यावेळी अॅड. सोहेल सिद्दीकी, अॅड. ब्रम्हानंद चव्हाण, अॅड. सय्यद मुसा, अॅड. उमर परसुवाले, अॅड. आयाज सूभानी, अॅड. अमजद पठाण, अॅड. सय्यद मुदस्सर, अॅड. अर्शद बागवान, अॅड. वैभव खरात, अॅड. कामरान खान, अॅड. सय्यद वाजेद, अॅड. इम्रान पठाण, अॅड. मोहम्मद सोहेल, अॅड. अश्रफ, अॅड. इरफान बिरादार, अॅड. अन्वर परसुवाले, अॅड. शेख वसीम, अॅड. शारुख, अॅड. दशरथ इंगळे, अॅड. वजाहद, अॅड. नदीम सय्यद,अॅड. शारुक भवणीवाले, अॅड. मोईन पाशा, अॅड. जमीर सय्यद, अॅड. अन्सर, अॅड. विनोद पांडव, अॅड. मोगल, अॅड. रिजवान यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.