मुंबई – मुंबईतील ग्रँट रोड इथं एक दुर्दैवी घटना घडलीय. ग्रँट रोड इथं एका म्हाडाच्या इमारतीचा काही भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. तर 3 जण जखमी झाले आहेत. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर बचावकार्य सुरु झाले होते. दरम्यान, इमारतीत अडकलेल्या सर्व नागरिकांना बाहेर काढण्यात यश आलं आहे.
ग्रॅण्ड रोड स्थानकाबाहेर रुबिनिसा मंझील ही इमारत आहे. या इमारतीचा तिसऱ्या आणि चौथ्या मजल्याचा काही भाग सकाळी 11 वाजता कोसळल्याची घटना घडली आहे. अग्निशमाक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. या इमारतीत 20 ते 22 नागरिक अडकले आहेत. नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्तीचे प्रयत्न करत आहेत. ग्रँट रोड (पश्चिम) येथील रेल्वे स्थानकाजवळील स्लेटर रोड येथे रुबिनिसा मंझिल नावाची चार मजली इमारत आहे. ही म्हाडाची इमारत आहे. याच इमारतीचा काही भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे.
दरम्यान, आज सकाळपासून मुंबईत जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं काही भागात जनजीवन देखील विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. वाहतुकीवर देखील मोठी परिणाम झाला आहे. रस्ते वाहतुकीसह लोकल सेवा उशीरानं सुरु आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळं नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज मुंबईत पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं सध्या जोरदार पाऊस सुरु आहे.
सध्या सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळेच इमारती कोसळण्याच्या दुर्घटना घडत आहेत. दरवर्षी पावसाळा सुरु झाली की, अशा इमारत कोसळण्याच्या दुर्घटना घडत असतात. अशीच एक दुर्घटना आज ग्रॅण्ड रोड परीसरात घडली. रुबिनिसा मंझील नावाच्या इमारतीचा काही भाग कोसळला आहे. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. दरम्यान, या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं देखील करण्यात येत आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीप्रमाणे मुंबईत पुढील काही तास आणखी पावसाचा जोर कायम राहणार आहे.