मुंबई – गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि उपनगरात जोरदार पावसानं चांगलंच झोडपून काढलं आहे. मुंबईत दुपारच्या वेळीदेखील ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. मध्यरात्री, पहाटेपासून मुंबई, कल्याण, ठाणे या भागात मुसळधार पाऊस कोसळताना दिसतोय.
त्यामुळे सकाळच्या वेळात सखल भागात पाणी साचण्याच्या समस्या तसेच मुंबईत लोकलने कामावर जाणाऱ्या प्रवाशांना या मुसळधार पावसाचा चांगलाच फटका बसताना दिसतोय. त्यामुळे ऑफिसला जाण्याच्यावेळीच मुंबईकरांना या पावसामुळे लेट धावणाऱ्या ट्रेनमुळे लेट मार्क लागण्याची चिंता असल्याने मनस्ताप सहन करावा लागतोय. तर मुंबईतील समुद्रात भरतीचा इशारा देण्यात आला असून सव्वा 4 मीटर उंचीच्या लाटा समुद्रात उसळण्याची शक्यता आहे. साडे 11 वाजता मुंबईतील समुद्रात भरतीचा इशारा देण्यात आला आहे. जर पाऊस वाढला तर मुंबईची तुंबई होण्याची शक्यता आहे.