जालना – अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचा आढावा दौरा जालना जिल्ह्याच्या विविध भागात सुरु आहे. या दौर्याला बुधवार दि. 24 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजेपासून सुरु झालाय.
यावेळी भाजपा नेते सतीश घाटगे यांनी बँकांच्या नाकर्तेपणामुळे आक्रमक भुमीक घेतलीय. नरेंद्र आण्णासाहेब पाटील यांच्यासमोर बँकेचा कारणामा उघड केलाय. शेकडो युवकांचे अर्ज असतांना मोजक्यांनाच कर्ज वाटप करुन मराठा तरुणांना कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे मराठा समाजातील युवकांचे कर्ज प्रस्ताव मंजूर करण्यासाठी संबधित बँकेस सूचना करण्याची मागणी सतिष घाटगे यांनी केलीय.
नरेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जालना जिल्ह्यातील विविध बँकाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. महामंडळ मार्फत दिल्या जाणार्या वैयक्तिक कर्जाचे प्रस्ताव बँका मंजूर करण्यास टाळाटाळ करतात. हेलपाटे मारायला लावतात. अधिकारी सहकार्य करत नाहीत. त्यामुळे सरकारवर युवक नाराजी व्यक्त करतात. अशा शब्दात सतीश घाटगे यांनी वस्तुस्थिती नरेंद्र पाटील यांच्या समोर मांडली. त्यावर नरेंद्र पाटील यांनी महामंडळाच्या लाभार्थ्यांची प्रलंबित कर्ज प्रकरणे त्वरित निकाली काढण्याचे निर्देश दिलेत. तसेच मराठा तरुणांनी सतीश घाटगे यांच्यामार्फत पाठपुरावा करावा असे आवाहन नरेंद्र पाटील यांनी यांवळी केलंय.