जालना – रास्तभाव दुकानदारांची बुधवार दि. 24 जुलै 2024 रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार, केरोसीन परवाना धारक महासंघाच्या मागण्या व अडीअडचणी च्या अनुषंगाने बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर, सहा. जिल्हा पुरवठा अधिकारी डी.एस. दिवटे यांची उपस्थिती होती.
या बैठकीत रास्तभाव दुकान परवानाधारक यांच्या महत्वाच्या मागण्या व अडीअडचणीवर चर्चा करण्यात आली. राज्यातील रास्तभाव दुकानामध्ये आजच्या महागाई निर्देशानुसार मार्जिनमध्ये योग्य ती वाढ करण्यात यावी. पॉस मशीन संदर्भात येणार्या अडीअडचणी तसेच रास्तभाव दुाकानाच्या मार्जिन संदर्भात निर्णय घेण्यात यावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी जिल्हातील रास्तभाव दुकानदार संघटनेचे पदाधिकारी मनीत कक्कड, प्रभाकर डोंगरे, बाबासाहेब हिवराळे, जगन्नाथ थोटे, नामदेव तनपुरे, विठ्ठल काळे, संभाजी कळकटे, गोवर्धन धबडकर व इतर रास्तभाव दुकानदान उपस्थित होते. अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिली आहे.