जालना तालुक्यातील पळसखेडा येथे बुधवार दि. 24 जुलै 2024 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत 1 कोटी 54 लक्ष रुपयाच्या रस्त्याच्या कामाचे उद्घाटन करण्यात आलं.
यावेळी रस्त्याच्या कामाचे खडीकरण व डांबरीकरण करणे, मजबूती करण करणे आदी कामांचा समावेश आहे. यावेळी जल जीवन मिशन योजनेअंतर्गत जीवन प्राधिकरण विभागाच्या वतीने नव्याने बांधण्यात आलेल्या जलकुंभाचे लोकार्पण देखील करण्यात आले.
यावेळी ज्ञानेश्वर माउली शेजुळ, डॉ. शरद पालवे, विकास पालवे, जिजाबाई जाधव, पंचफुला प्रधान, अशोक डोके, आत्माराम पालवे, उध्दव पालवे, मल्हारी पालवे, अर्जुन यादव, आसाराम जाधव, नारायण पवार, विजय जाधव, साहेबराव जाधव, राजु प्रधान, प्रमोद भालेराव, बद्री पालवे, रावसाहेब पालवे, काशीनाथ पालवे, रंगराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.