जालना – शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड बंधनकारक करण्यात आलंय. पंरतु, हेच आधार कार्ड काढण्यासाठी मोजकेच आधार केंद्र देण्यात आलेत. त्यामुळे सर्वसामान्य लाभार्थी हा शासकीय योनजेपासून वंचित राहत आहे. त्यामुळे प्रत्येक गावात आधार केंद्र सुरु करण्यात यावेत अशी मागणी रिपब्लिकन बहुजन सेनेचे जिल्हाध्यक्ष सुशील वाघमारे यांनी बुधवार दि. 24 जुलै 2024 रोजी दुपारी 4 वाजता जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केलीय.
जालना जिल्ह्यातील 80% जनता हि ग्रामीण भागत राहते, त्यात जगाचा पोशिंदा शेतकरी, जेष्ठ नागरीक, महिला, शेतमजूर, अपंग लोक हि ग्रामीण भागत राहतात, अशा लोकांना शासकीय योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर आधार कार्ड द्यावं लागतंय. परंतु, तेच आधार कार्ड काढण्यासाठी किंवा अपडेट करण्यासाठी आधार केंद्राच्या शोधात फिरावं लागतंय. त्यामुळे ग्रामणी भागातील जनता आधार कार्डमुळेच शासकीय योजनेपासून वंचित राहत आहे.
त्यामुळे त्यांच्या सुविधेसाठी प्रत्येक गावात आधार केंद्र सुरु करण्यात यावे. त्यामुळे लाभार्थ्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळविण्यासाठी मोजक्याच आधार केंद्रावर ताटकळत बसण्याची वेळ येणार नाही व योजनेपासून वंचित राहणार नाही. असेही निवेदनात म्हटलंय. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष सुशील वाघमारे, गौतम भाटसोडे, सोहेल शेख, रामेश्वर आंभोरे यांची नावे आहेत.