बीड जिल्ह्यातून क्लेशदायक घटना समोर येत आहे. नववीत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीवर लॉजवर नेऊन बलात्कार करण्यात आल्याची घटना घडून एक महिना उलटला असला तरी आरोपी अजून मोकाट आहेत. दरम्यान नववीत शिकणाऱ्या पीडितेवर धमक्यांमुळे शाळा बंद करण्याची नामुष्की ओढवली आहे. दरम्यान आरोपीच्या शोधासाठी दोन पथके रवाना झाली असून जिल्ह्यात या घटनेने खळबळ उडाली आहे.
बीड जिल्ह्यात एक लाजीरवाणी घटना समोर येत आहे. नववीत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीवर लॉजवर नेऊन बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर माजलगावसह बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. घटना घडून महिना उलटत असला तरी पोलिसांनी अद्याप आरोपींना अटक केली नाही. मुलीच्या कुटुंबाला धमकी मिळत नसल्याने मुलीवर शाळा बंद करण्याची दुर्दैवी वेळ आलीय. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी दोन पथके आरोपीच्या शोधासाठी तैनात केली आहे.
बीड जिल्ह्यातील माजलगावमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. येथे 14 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीला लॉजवर नेऊन बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी महिनाभरापूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता पण अद्याप आरोपी मोकाट आहेत. तसेच आरोपीकडून पीडितेच्या कुटुंबाला केस परत घ्या, अन्यथा ठार मारू अशी धमकीही दिली. त्यामुळे आरोपी मोकाट असल्यानं मुलीचं शिक्षण बंद करण्याची वेळ कुटुंबावर आली. आता पीडितेच्या आईने थेट मुख्यमंत्र्यांकडे न्यायाची मागणी केली. त्यामुळे लाडकी बहीण योजना राबविणारे सरकार आता मुलीला सुरक्षा आणि न्याय देणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बीडच्या माजलगाव शहर पोलीस ठाणे हद्दीत 6 जून रोजी नववीत शिकणारी पीडित विद्यार्थिनी रस्त्याने जात होती. त्यावेळी आरोपीने तिली गाडीवर बसवून माजलगाव शहरातील लॉजवर नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. तसेच याबाबत कुणाला सांगितलं तर जीवे मारेन अशी धमकी दिली. या धमकीमुळे पीडित मुलीने याबाबत कुणालाच काहीच सांगितलं नाही.
याघटनेनंतर आई मुलीला घेऊन पोलीस ठाण्यात गेली आणि 30 जून रोजी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र, या प्रकरणातील आरोपी अद्याप मोकाट आहेत. तो पीडितेच्या कुटुंबाला तुमच्या मुलीला उचलून नेऊ, अशा धमक्याही देत आहे. यावर बोलताना सामाजिक कार्यकर्ते बाबुराव पोटभरे यांनी हे प्रकरण सामूहिक बलात्काराचे आहे. त्यामुळे इतरांवरही गुन्हा दाखल करावा. आरोपीला अटक केली नाही तर पोलीस स्टेशनला घेराव घालण्याचा इशाराही पोटभरे यांनी दिला.