जालना – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत नोंदीसाठी जालना जिल्ह्याला डॅशबॉर्ड उपलब्ध झाला असून आजपर्यत एकूण 2 लाख 36 हजार 039 महिलांनी या योजनेसाठी अर्ज भरले असल्याची माहिती गुरुवार दि. 25 जुलै 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिलीय.
जालना जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या नोंदणीचे काम गतीने सुरू असून उर्वरीत लाभार्थीच्या नोंदी वेगाने करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी संबंधित यंत्रणेला दिल्यात. लाभार्थ्यांना जुलै व ऑगस्ट या महिन्याचा एकत्रित लाभ या योजनेच्या पहिल्या हप्त्यात ऑगस्टमध्ये दिला जाणार आहे. असंही जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी म्हटलंय. जालना जिल्ह्यात या योजनेच्या नोंदणीसाठी जिल्हाभरातील सर्वच शासकीय यंत्रणा कामाला लागली असून त्यासाठी स्वतंत्र कॅम्प देखील घेतले जात आहेत. आज दिवसभरात 15 हजार 845 महिलांनी अर्ज भरले असून मागील आठवडाभरात 73 हजार 602 लाभार्थ्यांनी अर्ज भरलेत. त्याच बरोबर शासनाच्या वतीने 2 हजार 390 महिलांचा सर्वे देखील करण्यात आलाय.