जालना शहरातील मातोश्री लॉन्स येथे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पाव्हणं जेवलात काय? फेम तथा प्रसिध्द गायीका राधा खुडे यांच्या भव्य सांस्कृतीक कार्यक्रमाची मेजवानी देण्यात आली. हा कार्यक्रम दि. 2 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आला असल्याची माहिती साहित्यरत्न फेस्टीवलच्या सचिव अॅड. कल्पना त्रिभुवन यांनी शुक्रवार दि. 26 जुलै 2024 रोजी दुपारी 12 वाजता पत्रकार परिषदेत दिली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खा. डॉ. कल्याण काळे, आ. कैलास गोरंट्याल, माजी आरोग्यमंत्री आ. राजेश टोपे, आ. नारायण कुचे, माजी आ. संतोष सांबरे, माजी आ. अरविंद चव्हाण यांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आहवान आयोजकाच्या वतीने करण्यात आलंय. या पत्रकार परिषदेस राजेश भालेराव, धनसिंह सुर्यवंशी, सचिन क्षिरसागर, अंकुश राजगीरे, सुनिल रत्नपारखे, अमित कुलकर्णी, मनिष तवरावाला यांची उपस्थिती होती.