घनसावंगी: शिक्षण, आरोग्य आणि रस्ते या मूलभूत सुविधापासून वंचित असलेल्या श्रीपत धामणगावची जनतेमध्ये विद्यमान आमदाराविरोधात शनिवारी मोठा रोष पाहायला मिळाला. कोणत्याही पदावर नसताना सतीश घाटगे यांनी केलेल्या विकासकामामुळे धामणगावकरांनी सतीश घाटगे यांना आगामी निवडणुकीसाठी पाठींबा दिला.
समृद्धी कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी धामणगावात भव्य शाखा उद्घाटन कार्यक्रम पार पडला. या सोहळ्यात जमलेल्या युवा वर्गाने आपल्या गावासाठी सर्व जनतेला सतीश घाटगे यांच्या बाजूने एकत्रित करत एका प्रकारे उठाव केला . सतीश घाटगे यांचे गावात जंगी स्वागत गावकऱ्यांनी केले. सतीश घाटगे यांनी श्रीपत धामणगावाला श्रीमंत धामणगाव बनविण्याचा शब्द दिला. तसेच येणाऱ्या काळात परिवर्तन अटळ आहे. असा विश्वास दिला. नूतन शाखेतील पदाधिकारी प्रदीप शिंदे, मच्छिंद्र येले, लखन इंडे, शरद फाटकुरे , रोहिदास शिंदे, विठ्ठल शिंदे, आकाश शिंदे, भरत शिंदे, अंकुश शिंदे, अंकुश राऊत आण्णासाहेब शिंदे, युनुस शेख, मोकिंद शिंदे, अनंत शिंदे, विकास येले, अर्जुन शिंदे, गणेश शिंदे यांनी या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला. यावेळी समृद्धी कारखान्याचे संचालक अभिजीत उढाण, राजेंद्र छल्लारे सर, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव कंटुले, कामगार विभागाचे जिल्हाध्यक्ष गोविंद आर्दड, ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष माधव टेहळे, भगवान तौर, हनुमान आर्दड, रमेश जाधव, बाळासाहेब बोरकर सह आदि भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
धामणगावच्या रस्त्याचा प्रश्न लवकरच लावणार मार्गी
धामणगाव हे घनसावंगी तालुक्यातील शेवटचे गाव असून या गावाला जोडणारा मुख्य रस्ता २५ वर्षापासून अत्यंत दयनीय बनला आहे. हा रस्ता नव्याने तयार करण्यासाठी सतीश घाटगे यांनी प्रयत्न करून मंजुरी मिळवून आणली आहे. या रस्त्यामुळे शाळकरी मुले आणि शेतकऱ्यांचे मोठे हाल होत होते.