सौ. संगीता ढेरे । उरण
पुरोगामी म्हणवल्या जाणार्या महाराष्ट्रात महिलांची सुरक्षा वेशीवर टांगल्याचा प्रकार समोर आलाय. उरण येथील एका 22 वर्षीय तरुणीची हत्या करत तिला झुडूपात फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालायला लावणारा हा प्रकार आहे. या घटनेमुे संपुर्ण महाराष्ट्र हादरुन गेला आहे. असे असतांनाही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी यावर कोणतीही भुमीका मांडली नाही. हे दुर्देव आहे.
नवी मुंबईमध्ये काही दिवसांपूर्वी एका महिलेवर मंदिरातील तीन पुजार्यांनी सामूहिक बलात्कार करत तिची दगडाने ठेचून हत्या केली होती. त्यानंतर आता नवी मुंबईच्या शेजारी असलेल्या उरणमध्ये आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. 22 वर्षीय यशश्री शिंदे नावाची तरुणी दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती. उरण शहरातील एनआय स्कूलजवल राहणार्या यशश्रीचा मृतदेह 27 जुलै रोजी कोटनाका पेट्रोल पंपाजवळ आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला तेंव्हा तिच्या शरीराची विटंबना केल्याचे लक्षात आले. तिचा चेहरा, शरीर आणि गुप्तांगावर जखमा आढळून आल्या. ही बातमी उरण शहरात वार्यासरखी पसरली. त्यामुळे उरण सह नवी मुंबई मधील नागरिकांत प्रचंड रोष निर्माण झालाय.
यशश्री तिच्या कुटुंबीयांसह उरण येथे राहत होती. ती बेलापूरमधील एका कंपनीत कामाला होती. गुरुवार दि. 25 जुलै रोजी सकाळी कामावर निघून गेली. त्यानंतर ती बेपत्ताच होती. तिचा फोन लागत नसल्याने तीच्या कुटुंबीयांनी तिचा शोध सुरु केला. त्यानंतर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली. पोलीस यशश्रीचा शोध घेत असताना रेल्वे स्थानकाजवळील झुडुपात एक मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहिलं असता मृतदेह अतिशय छिन्न-विच्छिन्न अवस्थेत आढळून आला. कुटुंबीयांनी मृतदेहाची ओळख पटविल्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. यशश्री शिंदेच्या वडिलांनी दाऊद शेख नामक इसमावर हत्या केल्याचा आरोप केला. एकतर्फी प्रेमातून ही हत्या झाली असावी, असा पोलिसांनाही संशय आहे. तरुणीच्या शरीरावर अनेक जखमा आढळून आलेल्या आहेत. वैद्यकीय चाचणीनंतर जर तिच्यावर बलात्कार झाल्याचे समोर आले तर तेही कलम जोडले जाईल. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे सात पथके तयार करण्यात आले असून आरोपीचा शोध सुरू आहे. या आरोपीला तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी दि. 28 जुलै रोजी उरणचे पुर्ण मार्केट बंद ठेवण्यात आले होते.
- महिला आयोगाची भुमीका काय?
या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मुली आणि महिलांची छेड काढली जात आहे. पुर्वी अस्तित्वात असलेली दामीनी पथके आता दिसेना झालीत. छेडछाड केली तरी कारवाई होत नाही, हा भास गुन्हेगारांच्या मनात असल्याने त्यांची मजल आता हत्या करण्यापर्यंत जात आहे. या राज्यातील मुली एकट्या दुकट्या फिरु शकत नाहीत. अप्रत्यक्षरित्या या राज्यात मुलींना चार भिंतीच्या आत ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. त्यावर सरकार आणि महिला आयोग देखील बोलायला तयार नाही. छोट्या-मोठ्या लग्नाच्या कार्यक्रमात हजर राहणार्या(फक्त त्यांच्या नात्यातील) राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांना उरणमध्ये येण्यास वेळ का मिळाला नाही? की त्यांना ही घटनाच अजुन माहिती नाही. महिला आयोगाने ठोस भुमीका घ्यावी आणि महिलेच्या सुरक्षेची हमी द्यावी. -
आरोपीला भर चौकात फाशी द्या; उरणच्या वाघीणींची डरकाळी
या प्रकरणातील आरोपीला शोधून त्याला केवळ कायद्याच्या चौकटीतला न्याय नकोय, तर ज्या पध्दतीले यशश्रीची हत्या झाली, त्याच पध्दतीने त्याला भर चौकात बांधून आणि एक-एक पार्ट काढून मरणाच्या यातना कशा असतात हे दाखवून द्यावे अशी मागणी उरणच्या महिलांनी केलीय.शिवाय त्याला भर चौकात फाशी दिली पाहिजे अशीही मागणी करण्यात आलीय. तळपायाची आग मस्तगात जाणारी ही घटना सर्वांनाच लाजविणारी आहे.
एकट्या दुकट्या महिलांना आडवून त्यांची छेड काढणार्यांचीही आता गय नाही. उरणच्या वाघीणी डरकाळ्या टाकत आहेत. एखाद्या मुलीकडे किंवा महिलेकडे कुणी वाकड्या नजरेनंही पाहिलं तरी त्याचे डोळे काढण्याची तयारीच आत उरणच्या वाघीणींनी केलीय.
आरोपी अटक ?
या प्रकरणातील संशयित आरोपी हा बंगळुरू येथील असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पोलिसांनी आरोपीला महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरून अटक केली असल्याचंही सांगण्यात आलंय.