नवरा-बायकोतील भांडण मिटवण्यासाठी मध्यस्थी करणे भाडेकरुला भारी पडले आहे. घर मालकाने चाकू भोकसून भाडेकरुची हत्या केल्याची घटना घडली आहे. नागपूरमध्ये ही घटना घडली आहे. पंकज सोलंकी असे हत्या झालेल्या भाडेकरुचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी घर मालकाला अटक केली आहे. पंकज सोलंकी हा एका कंपनीत काम करत होता.
अधिकची माहिती अशी की, भाडेकरु आपल्या घरी पोहोचला त्यावेळी म्हणजेच शुक्रवारी रात्री घरमालक आणि त्याच्या पत्नीमध्ये भांडण सुरु होते. त्यामुळे पंकजने त्यांची भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, रागाने लाल झालेल्या घरमालकाने पंकजची धारशस्त्राने हत्या केलीये.
पोलिसांच्या माहितीनुसार, पंकज सोलंकीवर हल्ला करण्यात आल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यासाठी हालवण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी या प्रकरणी घर मालकाला अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आलाय.