अंबड: प्रामाणिक करदात्यांच्या पैशातून आणि महाराष्ट्र सरकारच्या सहकार्यातून रूई गावाचा २५ वर्षाचा विकासाचा अनुशेष सतीश घाटगे यांनी फक्त एका वर्षात भरून काढला आहे. गावकऱ्यांनी मागणी केलेले सर्व कामे सतीश घाटगे यांनी पूर्ण करून गाव समृद्ध केले. सोमवारी त्यांच्या हस्ते पूर्ण झालेल्या सर्व कामाचे लोकार्पण करण्यात आले.
समृद्धी कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे पाटील संविधानिक पदावर नसताना विविध घटकांच्या प्रमुख समस्या मार्गी लावत आहे. रुई हे गाव २५ वर्षापासून विकासाच्या प्रवाहाच्या बाहेर होते. या गावातील रस्त्याचा प्रश्न बिकट होता. सतीश घाटगे यांच्या प्रयत्नातून गावाच्या दृष्टीने महत्वाचे असलेले सर्व रस्ते सिमेंट कॉंक्रीटने तयार झाले आहे.
रुई गावातील अंतर्गत रस्ते, स्मशानभूमी यासह तांड्याला जोडणाऱ्या रस्त्याचा प्रश्न देखील सतीश घाटगे यांनी सोडवला. तसेच नव्याने मंजूर करून आणलेल्या विविध विकास कामांचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले. या विकासकामामुळे रुई गावाचा विकासाचा अनुशेष खऱ्या अर्थाने २५ वर्षानंतर भरून निघाला अशा अशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली.
गावचे विकासप्रिय उपसरपंच ईश्वर धाईत यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. या लोकार्पण सोहळ्यास डॉ. रमेश तारगे, राहुल कणके, अरुण घुगे, चंद्रकांत बांगर,शरद खरपडे, राजेंद्र येसलोटे, वसंतराव खोजे, गणेश खोजे, माधव टेहळे, बंडू शिंगटे, कृष्णासिंग पवार, परमेश्वर शिंदे, नवनाथ डोईफोडे उद्धव लांडे यांची उपस्थिती होती.