महसूल दिनानिमित्त कुंभारीत वृक्षारोपण
कुंभारी:- दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथे महसूल सप्ताह दिनानिमित्त मंडल अधिकारी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमासह तलाठी कार्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी तलाठी भीमाशंकर भुरले, ग्रामपंचायत सदस्य बाबुशा गाडेकर, इरेश कटारे, विजयश्री जवळे, भागीरथी बिराजदार, विजयकुमार शिंदीबंदे, कोतवाल गुरुदेवी जवळे उपस्थित होते.