जालना जिल्ह्यातून जाणार्या जालना-जळगाव या नवीन रेल्वे मार्गाला मंत्रीमंडळाने दि. 9 ऑगस्ट 2024 रोजी मंजुरी दिली असल्याची माहिती रेल्वेच्या नांदेड विभागाचे जनसंपर्क अधिकारी यांनी शनिवार दि. 10 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9.30 वाजता दिली.
महाराष्ट्रासह 7 राज्यातील 14 जिल्ह्यांचा समावेश असलेल्या रेल्वेच्या 8 प्रकल्पांना मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या 8 प्रकल्पांपैकी एक म्हणजे जालना-जळगाव दरम्यानचा नवीन रेल्वे मार्ग आहे.
मराठवाडा आणि महाराष्ट्राचा उत्तर भाग जोडण्यासाठी 174 किमी लांबीचा हा रेल्वे मार्ग तयार करण्यात येणार आहे. तत्कालीन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी प्रस्तावित केलेल्या या रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाल्याने जालनेकरांसाठी एक पर्वनीच असणार आहे. या संदर्भात रेल्वे विभागाकडून शनिवार दि. 10 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 1 वाजता पत्रकार परिषदेत या संदर्भात सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.