उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीने महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करण्यासाठी महायुती प्रयत्न करीत आहे. महायुती सरकारने नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाकांक्षी वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्पास मान्यता दिलीय. महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचे महायुतीचे मिशन आहे. त्यासाठी हा महत्वकांक्षी प्रकल्प सुरू होतोय.
या नदीजोड प्रकल्पांद्वारे महाराष्ट्रातील नद्या जोडून महाराष्ट्रातील दुष्काळावर मात करण्याची संकल्पना श्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना मांडली होती. या प्रकल्पामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील सिंचनाचा अनुशेष भरून निघण्यास मदत होणार आहे. प्रकल्पासाठी 87 हजार 342 कोटी 86 लाख रुपये इतका खर्च येणार आहे. या प्रकल्पातून गोदावरीच्या उपखोर्यातून वैनगंगा नदीतील पाणी बुलढाणा जिल्ह्यातील वैनगंगा प्रकल्पात आणण्यात येईल. यासाठी एकूण 426.52 किमीचे जोडकालवे बांधण्यात येतील.
या नदीजोड प्रकल्पामुळे विदर्भातील पावणेचार लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. यामुळे शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये मोठे क्षेत्र सिंचनाखाली येऊन शेतकरी समृद्ध होणार आहे.विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यातील 15 तालुक्यातील सिंचन तसेच पिण्याचे पाणी ही समस्या सोडवण्यास या प्रकल्पामुळे मदत होईल. शिवाय औद्योगिक कारणांसाठी देखील मुबलक पाणी उपलब्ध असेल. रब्बी हंगामातील सिंचनाच्या सोयीसाठी या प्रकल्पा अंतर्गत 31 साठवण तलाव देखील बांधले जाणार आहेत. यामुळे रब्बी हंगामात सुद्धा शेतकर्यांना मुबलक पाणी मिळणार आहे. त्यामुळे विदर्भातील तब्बल 15 तालुक्यातील लाखो हेक्टर जमीन सिंचनाखाली येण्यास मदत होईल.