जालना : भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित विधान परिषदेचे सदस्य तथा अण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे यांनी घनसावंगीतील दलित, वंचित घटकांच्या सामाजिक परिस्थितीची पाहणी केली. या पाहणीत दलित वंचित समाज हा शासकीय योजनापासून वंचित असल्याचे त्यांना दिसून आल्याचे त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार राजेश टोपे यांनी पंचवीस वर्षात दलित मातंग समाजाचा फक्त मतासाठी वापर झाला, अशा शब्दात त्यांनी राजेश टोपेवर टीका केली. तसेच येणाऱ्या काळात दलित वंचित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष मातंग समाजाचे उच्चशिक्षित युवा नेते यांची विधान परिषदेवर निवड झाली आहे. त्यांनी मराठवाड्यातील दलित, वंचित आणि मातंग समाजाचे प्रश्न जाणून घेण्यासाठी दौरा सुरू केलेला आहे. शनिवारी अमित गोरखे यांनी घनसावंगी मतदारसंघातील दलित वंचित घटकाच्या विविध गावांना भेटी देऊन त्यांचे प्रश्न जाणून घेतले. या भेटीत त्यांना दलित समाजातील अनेक घटकांना घरकुलाचा लाभ देखील मिळू शकलेला नाही. अनुसूचित जाती जमातीच्या जनतेसाठी महायुती सरकारने राबवलेल्या अनेक योजना या त्यांचापर्यंत पोहचू शकल्या नसल्याचे दिसले. एक लोकप्रतिनिधी म्हणून अनुसूचित दलित वंचित समाजाला शासकीय योजनापासून, घरकुलापासून वंचित ठेवनारा लोकप्रतिनिधी असेल तर त्याला बदलवण गरजेचे आहे. येणाऱ्या काळात सरकारच्या माध्यमातून घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक दलित, वंचित घटकाला शासनाच्या योजना त्यांच्या दारापर्यंत नेण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी भाजपा नेते सतीश घाटगे, भाजपा अनुसूचित जाती- जमाती मोर्चाचे उपाध्यक्ष सर्जेराव जाधव यांची उपस्थिती होती.
महायुती सोबत राहण्याचे आवाहन
सतीश घाटगे यांनी प्रत्येक घटकसाठी केलेल्या कार्याचा अमित गोरखे यांनी कौतुक केले. अनुसूचित जाती जमाती च्या घटकांना त्यांचे प्रश्न सोडवून घेण्यासाठी महायुती एकमेव पर्याय आहे. येणाऱ्या काळात महायुती सोबत राहण्याचे आवाहन त्यांनी घनसावंगी विधानसभेतील जनतेला केले.