जालना तालुक्यातील देवमुर्ती येथे दि. 11 ऑगस्ट रोजी दिवसा ढवळ्या जबरी चोरी करुन फरार झालेल्या आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या असून त्यांच्या ताब्यातून 7 लाख 14 हजार 380 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. अशी माहिती पोलीस अधिक्षक अजय कुमार बंसल यांनी सोमवार दि. 12 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 वाजता दिलीय.
देवमुर्ती येथील विठ्ठल तुकाराम चव्हाण यांच्या घरी दिवसा ढवळ्या चोरी करुन दोन चोरटे हे सिंदखेड राजाच्या दिशेने पळून गेले होते. या घटनेची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच त्यांनी विविध पथके तपासासाठी रवाना केले. दरम्यान कन्हैयानगर चौफुली येथे पोलीसांनी पाठलाग करुन चारचाकी वाहनातून पळून जाणार्या दोन आरोपीच्या मुसक्या आवळ्यात. अर्जुनसिंग छगनसिंग भोंड वय 24 वर्ष रा. गुरुगोविंदसिंग नगर, जालना, सागरसिंग फंट्यासिंग अंधरेले उर्फ बावरी वय 24 वर्ष रा. हरिगोविंद रेसीडेंन्सी, सरस्वती मंदीरा जवळ जालना असे अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून चोरी केलेल्या चोन्या चांदीच्या दागीन्यासह 7 लाख 14 हजार 380 रुपयाचा मुद्देमाल आणि एक चारचाकी वाहन जप्त करण्यात आलंय.
सदरील आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन सागरसिग फंट्यासिंग अंधरेले उर्फ बावरी याच्यावर यापुर्वी 31 गुन्हे तर अर्जुनसिंग छगनसिंग भोंड याच्यावर 27 गुन्हे दाखल आहेत. त्यांनी दि. 7 ऑगस्ट 2024 रोजी नागपुर येथे देखील दरोडा टाकला होता. त्यात देखील हे आरोपी हवे होते. शिवाय विविध जिल्ह्यात देखील त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल असल्याचं पोलीस अधिक्षक अजय कुमार बंसल यांनी सांगीतलंय.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सपोनि योगेश उबाळे, सपोनि शांतीलाल चव्हाण, पोउपनि राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार सॅम्युअल कांबळे, कृष्णा तंगे, रमेश राठोड, रामप्रसाद पव्हरे, भाऊराव गायके, लक्ष्मीकांत आडेप, सुधीर वाघमारे, सागर बाविस्कर, दत्ता वाघुंडे, ईरशाद पटेल, सतिश श्रीवास, आकुर धांडगे, देविदास भोजणे, संदीप चिंचोले, धीरज भोसले, योगेश सहाने यांच्यासह तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार चंद्रकांत माळी, लक्ष्मण शिंदे, ग्रामिण वाहतुक शाखेचे सपोउपनि सुधाकर नागरे, विनायक चित्राल यांनी केलीय.