जालना तालुक्यातील डांबरी येथील ग्रामपंचायतीकडून कोणत्याही प्रकारची विकास कामे होत नसल्याने तसेच गावात घाणीचं साम्राज्य पसरल्याने त्या समस्या सोडविण्यात याव्यात व विकास कामे करावीत या मागणीसाठी सोमवार दि. 12 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 वाजेपासून डांबरी ग्रामपंचायतीसमोर तक्रारदार उपोषणाला बसलेत.
यापुर्वी तक्रारदार प्रदीप दवंडे, सोपान दवंडे, सदानंद दवंडे यांनी गावातील समस्या संदर्भात ग्रामपंचायतीला निवेदन दिले होते, परंतु, त्या निवदेनाची कोणतीही दखल ग्रामसेवक यांनी घेतली नाही. त्यामुळे आजपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर तक्रारदार यांनी उपोषण सुरु केलंय. गावातील सिमेंट रस्ता, नाली, गटार स्वच्छ करावेत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळचा सिमेंट रस्ता करुन, तेथे साचणार्या पाण्याचा निपटारा करावा, सहा वर्षांपासून बंद स्थितीत असलेल्या तांड्यातील अंगणवाडी दुरुस्तीचे काम करुन ती स्वतंत्रपणे पुर्वरत सुरू करावी, अनुसूचित जातीसाठी स्वतंत्र स्मशानभूमीचे करावे आदी मागण्या या उपोषकर्त्यांनी केल्यात.