शासनाने मागासवर्गीय कर्मचार्यांना पदोन्नतीमधील आरक्षण तात्काळ लागू करावं या व इतर मागण्यासाठी मंगळवार दि. 13 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचार्यांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आलं.
यावेळी जिल्हाधिकारी यांना कर्मचार्यांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलंय की, शासनाने महाराष्ट्रातील मागासवर्गीय कर्मचार्यांना पदोन्नती पासुन वंचित ठेवलंय. शिवाय मागासवर्गीयांच्या पदोन्नत्या रोखल्या रोखण्यात आल्यात. त्यामुळे मागसवर्गीयांच्या पदोन्नत्यांना अडथळा निर्माण करण्यात आलाय.
मागासवर्गीय कर्मचार्यांची पदोन्नती रोखता येणार नाही असे मा. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश देवून ही शासनाने कोणताही निर्णय घेतला नाही. तसेच आरक्षणाची रिक्त पदे न भरणे संविधानाच्या विरोधी धोरण असल्याचंही निवेदनात म्हटलंय. 2011 मध्ये खासबाब म्हणून मागासवर्गीय अनुशेषाची विशेष भरती प्रक्रिया राबवून सर्व जागा भरण्यात आल्या होत्या, राज्यात कंत्राटी भरती धोरण अंमलात आणल्यामुळे राज्यातील लाखो बेरोजगारांचे नुकसान झाले. त्यामुळे शासनाप्रती असंतोष निर्माण झालाय. असंही निवेदनात म्हटलंय. यावेळी आंदोलक कर्मचार्यांनी जोरदार घोषणा देत आंदोलनाकडे लक्ष वेधून घेतलं.