जालना जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या जालना शाखेच्या वतीने मंगळवार दि. 13 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 12 वाजता मुक्तेश्वर लॉन्स येथे हर घर तिरंगा अभियान 2024 राबविण्यात आले. दरम्यान या अभियाना अंतर्गत सांस्कृतीक कार्यक्रम आणि आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
देशभरात स्वातंत्र्य महोत्सव साजरा होत असतांना हर घर तिरंगा अभियान 2024 राबविण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गत विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे. त्याच पद्धतीने जालना जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या जालना शाखेच्या वतीने सांस्कृतीक कार्यक्रम आणि आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. ग्रामीण भागात जावून काम करणार्या ग्रामसेवकांना प्रोत्साहन मिळावं यासाठी हा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार दिला जातो. दरम्यान सांस्कृतीक कार्यक्रमात महिला ग्रामसेवीकांनी उत्कृष्ट डांन्स करुन सर्वाचेच लक्ष वेधून घेतलं.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधिक्षक अजय कुमार बंसल, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मिना, आयुक्त संतोष खांडेकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी कोमल कोरे, कर्मचारी महासंघाचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण पवार, जिल्हा ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष डी.बी. काळे यांच्यासह सर्वग गटविकास अधिकारी व कर्मचार्यांची उपस्थिती होती.