जालना : महायुती सरकारने आर्थिक दुर्बल घटकांतील महिलांना आधार देण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरु केली आहे.या योजनेचा लाभ शेवटच्या गरीब महिलापर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाने विधानसभा क्षेत्रनिहाय समिती तयार केली आहे.त्यानुसार घनसावंगी विधानसभेच्या समितीच्या अध्यक्षपदी समृद्धी कारखान्याचे चेअरमन तथा भाजप नेते सतीश घाटगे पाटील यांची यांची शासनाने निवड केली आहे.या निवडीचे सर्व जनतेने स्वागत केले आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना राज्यात लोकप्रिय ठरली आहे.या योजनेअंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील आर्थिक दुर्बल घटकांतील महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला १५०० रुपये जमा होणार आहेत.विवाहित,विधवा,घटस्फोटित,परित्यक्ता आणि निराधार महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.या योजनेचा लाभ प्रत्येक पात्र महिला भगिनींना मिळावा यासाठी घनसावंगी विधानसभेसाठी शासनाने समिती गठीत केली असून या समितीच्या अध्यक्षपदी सतीश घाटगे पाटील यांची निवड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशान्वये जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी केली आहे.
एकही पात्र महिला वंचित राहणार नाही, हा माझा शब्द आहे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे.घनसावंगी विधानसभेतील एकही लाडकी बहिण या योजनेपासून वंचित राहणार नाही,हा माझा सर्व भगिनींना शब्द आहे.या योजनेची अंमलबजावणी युद्धपातळीवर करण्यात येईल.या योजनेसंदर्भात कोणतीही अडचण भासल्यास अंबड व घनसावंगी येथील जनसेवा कार्यालयाशी संपर्क साधावा.अर्ज सादर न करू शकलेल्या महिलांचा गावात जाऊन अर्ज भरून घेण्यात येईल.त्यामुळे महिलांनी निश्चिंत राहावे….सतीश घाटगे पाटील,लाडकी बहिण योजना अध्यक्ष,घनसावंगी विधानसभा