अंबड – तालुक्यातील वडीकाळ्या गाव आणि गावाअंतर्गत येणारे लालसिंग नाईक तांडा व दुर्गा नाईक तांडा मुलभूत सोयी सुविधांपासून वंचित होते. या गावाला शासनाच्या माध्यमातून सतीश घाटगे यांनी समृद्ध केल आहे. प्रामाणिक करदात्यांच्या पैशातून आणि महाराष्ट्र सरकारच्या सहकार्यातून या ठिकाणी १ कोटी १५ लाख रुपयांचा निधी सतीश घाटगे यांनी मिळवून दिला. त्यातून तयार झालेल्या रस्त्याचे गावकऱ्यांच्या साक्षीने सतीश घाटगे यांनी गुरुवारी लोकार्पण केले. तसेच नव्याने १ कोटी ३३ लाख रुपयांच्या शेत रस्ते खडीकरण व सभामंडपाच्या कामाचेही उद्घाटन केले.
याप्रसंगी गावकऱ्यांचा उत्साह येणाऱ्या काळात परिवर्तनाची साक्ष देणारा होता. गावच्या विकासासाठी राजकारण बाजूला ठेवून एकत्र आलेल्या ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्याचे घाटगे साहेबांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी आसाराम चव्हाण , भगवान ढेबे, संदीप चव्हाण, गणेश नरवडे, गजानन रक्ताटे, योगेश गव्हाणे, नामदेव काळे , भरत तनपुरे, पंकज रक्ताटे, दिलीप राठोड, मनोज मुळे, शिवाजी राठोड आदींनी परिश्रम घेतले.