जालना शहरातील गांधीनगर भागातील रोहणवाडी पुल परिसरात दि. 14 सप्टेंबर 2024 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास कारवाई करुन एका संशयीत आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून एक पिस्टल आणि दोन जिवंत काडतूसं जप्त करण्यात आलेत. या प्रकरणी सदरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती रविवार दि. 15 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 8 वाजता पोलीस सुत्रांनी दिली.
रोहणवाडी पुल परिसरात वाळु तस्कर कमरेला पिस्टल लावून फिरत असल्याची गोपनीय माहीती सदरबाजार पोलीस ठाण्याच्या डिबी पथकाला मिळाली होती. त्यामुळे त्यांनी रोहणवाडी पुलाजवळ एका खाजगी वाहनाने धाव घेतली. दरम्यान तीथे एका संशयीताला ताब्यात घेत त्याची चौकशी केली. हिस्वण येथील चक्रधर कव्हळे या संशयीताला ताब्यात घेऊन त्याला विश्वासात घेतलं असता त्यांने पोलीसांच्या भितीने गांधीनगर स्मशान भुमीजवळील येथील रोहनवाडी पुलाजवळ लपवून ठेवलेली पिस्टल आणि दोन जिवंत काडतूसं काढून दिली. पोलीसांनी सदरील शस्त्र जप्त केलं असून त्याच्यावर सदरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, अप्पर पोलीस अधिक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप भारती, डी.बी पथक प्रमुख पोउपनि भगवान नरोडे, जगन्नाथ जाधव, धनाजी कावळे, नजीर पटेल, दुर्गेश गोफणे, गणेश तेजनकर, अजिम शेख केली.