जालना जिल्ह्यात कधी काय होईल सांगता येत नाही. न्याय देण्यासाठी बसलेल्या बाल कल्याण समितीच्या अध्यक्षानेच महिलांना अश्लिल हावभाव करुन त्यांच्या सोबत अश्लिल वर्तन केल्याचा आरोप बाल कल्याण समितीच्या सदस्यांनी केलाय. त्यामुळे बाल कल्याण समितीच्या अध्यक्षावरच कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अशी माहिती शुक्रवार दि. 20 सप्टेंबर 2024 रोजी रात्री 8 वाजता पोलीस सुत्रांनी दिली.
या प्रकरणी बाल कल्याण समितीच्या एका महिला सदस्यांनी बाल कल्याण समितीच्या अध्यक्षावर गंभीर आरोप केलेत. शिवाय त्यांची जिल्हाधिकारी यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकार्याकडे देखील तक्रार करण्यात आली. शिवाय डिसेंबर 2023 ते दि. 19 सप्टेंबर 2024 पर्यत बाल कल्याण समितीचे अध्यक्ष एकनाथ सदाशीव राऊत यांनी त्रास दिल्याचं तक्रारीत म्हटलंय. त्यामुळे राऊत यांच्यावर बीएनएस 2023 च्या कलम 75, 296, 79, 352, 351(2), (3) नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. बाल कल्याण समितीच्या महिला सदस्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलय की, अध्यक्ष एकनाथ सदाशीव राऊत हे कानामध्ये हेडफोन लावुन फिर्यादी व साक्षीदार यांच्या समक्ष अश्लिल व रोमांनटिक गाणे गात होते तसेच समिती समोर हजर केलेल्या महिला समक्ष फिर्यादिस साक्षीदार यांना अपमानास्पद बोलून त्यांच्याकडे असश्लिल नजरेने पाहुन डोळ्याने ईशारे करुन मनास लज्जा वाटेल असे कृत्य करीत होते, तसेच त्यांच्या मनासारखे न वागल्यास पगार पत्रक पाठविणार नसल्याची धमकी देत होते. माझे कोणी वाकडे करु शकत नाही, सौ दाऊद एक राऊत असा डॉयलॉग मारीत होते असे तक्रारीत म्हटलंय. या प्रकरणी महिला सदस्यांनी महिला व बालविकस विभागाचे आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार केली आहे. शिवाय कदीम जालना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन बालकल्याण समितीचे अध्यक्ष एकनाथ राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.