मराठा समाजाच्या मागण्या मान्य करुन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण थांबविण्यात यावे, अन्यथा महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मराठा आंदोलक शैलेश देशमुख आणि इतरांनी शनिवार दि. 21 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजता दिलाय.
मराठा समजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा 16 सप्टेंब 2024 पासून आमरण उपोषण सुरु केलंय. परंतु, त्यांच्याकडे कुणीही राजकीय नेता फिरकत नसल्याने तसेच त्यांची तब्येत खराब होत असल्याने मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलंय, त्यावेळी शैलेश देशमुख, सोपान तिरुखे, कृष्णा पडूळ, बाबा उगले यांच्यासह अनेकांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधून सरकारला कडक इशारा दिलाय. सरकारने मराठा समाजाचे आंदोलन दडपण्यासाठी ओबीसीच्या आंदोलनकर्त्यांना देखील आणून बसवल्याचा गंभीर आरोप देखील मराठा समाजाच्या वतीने करण्यात आलाय.