जालना शहरातील गुंगीकारक आणि उत्तेजीत करणार्या औषधांचा भंडाफोड जालना स्थानीक गुन्हे शाखेने दि. 6 सप्टेंबर 2024 रोजी केला होता. परंतु, स्थानिक गुन्हे शाखा त्यावरच थांबली नाही तर त्यांनी थेट त्याच्या मुळाशी जात उत्पादन करणार्या कंपनीलाच गवसनी घातलीय. कानून के हात बहोत लंबे होते है । असे म्हणटले जाते. आणि ते आज स्थानिक गुन्हे शाखेने दाखवून सुध्दा दिले. जालन्यात गुंगीकारक आणि उत्तेजीत करणार्या औषधीचा सप्लाय करणार्या आरोपीच्या थेट मध्यप्रदेशातील बैतुल जिल्ह्यातून मुसक्या आवळल्याची माहिती पोलीस अधिक्षक अजय कुमार बंसल यांनी शुक्रवार दि. 20 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 3 वाजता पत्रकार परिषदेत दिली.
मानवी आरोग्यास अपायकारक आणि गुंगीकारक बटन गोळया अवैधरित्या विक्री करणार्या जालना येथील अल्तमश शेख निसार शेख, संतोष बालासाहेब जाधव, राहुल भागाजी गायकवाड, उध्दव शिवाजी पटारे यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून एकुण 8 लाख 11 हजार 288 रुपये किंमतीच्या बटन गोळ्या जप्त केल्या होत्या. त्यांच्यावर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलाय. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखा आता या गुन्ह्याच्या तळाशी जात आहे. पहिल्या कारवाईत ताब्यात घेतलेल्या संशयीत आरोपींनी आकोला येथून या गोळ्याचा सप्लाय होत असल्याची मातिही दिली. त्यामुळे आकोल्यातून सागर गुणवंतराव आठवले याला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलीसांनी त्याची देखील चौकशी केली असता त्याला अमरावतीच्या कपिल किसनलाल साहु, रा. मसानगंज, अमरावती याने गुंगीकारण गोळ्या पुरविल्याची माहिती दिली. त्यामुळे पोलीसांनी पुन्हा त्याला अमरावतीमधून अटक केली. त्याच्या ताब्यातून 87 हजार 233 रुपये किंमीचा मुददेमाल जप्त करण्यात आला. पुन्हा पोलसांनी अमरावतीच्या आरोपीची चौकशी केली असता त्यांना मध्य प्रदेशातील उमरीया, ता. आमला, जि. बैतूल येथील कृष्णा पहाडे हा सप्ताय करीत असल्याचे समोर आहे.
त्यामुळे पोलीसांनी पहाडे याला सुध्दा अटक केली असून पोलीस आता उत्पादनाच्या मुळाशी जात आहेत. त्यामुळे मुख्य पुरवठादाराचा शोध घेऊन नशेच्या गोळयांचं जाळं उध्दस्त करण्याची तयारी पोलीसांनी केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. योगेश उबाळे, पोउपनि राजेंद्र वाघ, पोलीस अमंलदार रुस्तुम जैवाळ, सागर बाविस्कर, कैलास खाडे, जगदीश बावणे, सतीष श्रीवास, इरशाद पटेल, किशोर पुंगळे यांनी केली.