जालना – महाराष्ट्रातील ग्रामसेवकांच्या वेतनातील त्रुटी दुर करण्यात आली असून ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी या दोन्ही पदांना एकत्र करून ग्रामपंचायत विकास अधिकारी हे नवीन पद तयार करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने सोमवार दि. 23 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 4 वाजता जिल्हा परिषदेसमोर ग्रामसेवकांच्या वतीने फटाके फोडून, पेढे वाटून गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला.
मागील अनेक वर्षापासून या निर्णयासंदर्भात संघटनेने शासनाकडे मागणी केली होती. अखेर या प्रलंबित मागणीवर आज शासनाने कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन ग्रामपंचायत विकास अधिकारी या नावाच्या पदावर शिक्कामोर्तब केलं. सरकारने ग्रामसेवकांना न्याय दिल्याने राज्यभरात आणि जालना जिल्ह्यात देखील ग्रामसेवकांनी आनंद उत्सव साजरा केला. यावेळी ग्रामसेवक संघटनेचे व जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे नेते प्रवीण पवार, जिल्हाध्यक्ष डी.बी.काळे, जिल्हा सरचिटणीस पी.एस. वाघ, महिला उपाध्यक्ष श्रीमती दुर्गा भालके, जिल्हा उपाध्यक्ष काचेवाड, परतुर तालुका अध्यक्ष बाबा चव्हाण, सचिव नागरे, घनसावंगी सचिव दत्ता मानकर, तालुका अध्यक्ष रुपणर, जालना तालुका सचिव महेश वझरकर, संचालक गणेश कुरंगळ, संचालक गजानन मुपडे, महिला उपाध्यक्ष शारदा साबळे, अलका धांडे, श्रीमती इंगळे, तायडे, अभिजित खैरे, अमृत कोकाटे, शिवाजी दळवी, किशोर देशमुख, अमरदीप डोईफोडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.