जालन्यातील प्रसिद्ध व्यापारी अल्केश बागडिया यांनी स्वतःवर बंदुकीची गोळी झाडल्याची खळबळ जनक घटना आज दि.24 मंगळवार रोजी सकाळी नऊ वा. च्या सुमारास ऊघडकीस आली., अल्केश बगडिया असे व्यापाऱ्याचे नाव असून त्यांनी आपल्या जालना शहरातील नाथ नगर येथील राहत्या घरात स्वतःवर गोळी झाडल्याची प्राथमिक माहिती मिळाली. अल्केश बगडिया वय 45 ते 50 वर्ष यांना नातेवाईकांनी तातडीने छत्रपती संभाजी नगर येथे हलवले असून खाजगी रूग्णालयात उपचार चालू असल्याची माहिती नातेवाईकांच्या वतीने देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच डी वाय एस पी अनंत कुलकर्णी, सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि डीबी पथकाने घटनास्थळी धाव घेतली. स्वतःवर गोळी झाडण्याचे कारण अद्याप पर्यंत अस्पष्ट असून पोलीस तपासात ते निष्पन्न होईल. दरम्यान शहरातील व्यापाऱ्यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतल्यानंतर ही या घटनेची पोलिसांकडून आणि नातेवाईकांकडून गोपनीयता ठेवण्यात आली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी आनंत कुलकर्णी, सदर बाजार पोलिस निरीक्षक संदीप भारती यांच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली.
मात्र, नेकमी काय घटना घडली याची माहिती देण्यासाठी पोलिस आणि नातेवाई तयार नाहीत. त्यामुळे व्यापारी अलकेश बगडीया यांनी कौटुंबिक वादातून की व्यावसायिक कारणावरून स्वतःवर गोळी झाडून घेतली हे अद्यापि स्पष्ट झाले नाही. दरम्यान पोलिसांकडे अद्यापि या घटनेची कोणतीही नोंद नाही.