जालना – मराठा आंदोलन जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी जालना शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवार दि. 25 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजेपासून धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. यावेळी पाठींबा देण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी सभापती आप्पासाहेब कदम, मातंग मुक्ती सेनेचे अशोक साबळे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत पाठींबा दिला असून मागण्या मान्य करण्याची मागणी केली.
मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षण मिळावे याकरिता सहाव्यांदा उपोषणाला बसले होते. त्यांच्या मागण्या शासन दरबारी मंजूर होत नसल्याने ते आपल्या उपोषणावर ठाम होते. त्यांना पाठिंबा म्हणून जालन्यात आज मातंग मुक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अशोक साबळे आणि जालना जिल्हा परिषदेचे माजी सभापती डॉक्टर आप्पासाहेब कदम यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले.