जालना – मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला धारेवर धरत मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्याची मागणी केली. दरम्यान ओबीसी समाज देखील आंदोलनात उतरलाय. आता बौध्द समाजातील आंदोलक विकास लहाने यांनी देखील सरकारला धारेवर धरत भिमा कोरेगाव प्रकरणासह, न्याय हक्कासाठी करण्यात आलेल्या आंदोलानातील सर्वच तरुणावरचे गुन्हे मागे घेण्याची मागणी बुधवार दि. 25 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता केली.
दरम्यान त्यांनी दि. 19 सप्टेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केलंय. परंतु, त्याची धखल घेतली जात नसल्याने बौध्द समाजातील आंदोलक विकास लहाने यांनी आक्रमक भुमीका घेतली. त्यामुळे आता बौध्द समाज देखील आपल्या हक्काच्या मागण्यासाठी रस्त्यावर उतरणार असून सरकारची चांगलीच गोची करणार असल्याचं विकास लहाने यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलंय.
यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात शेतकर्यांचा प्रश्न देखील मांडलाय. शेतकर्यांचे सरसकट कर्ज माफ करण्यात यावे, बौध्द तरुणांना 50 लाखापर्यत बिनव्याजी कर्ज देण्यात यावे, घरकुलाची रक्कम 5 लाख रुपये करण्यात यावी, एससीएसटी उप वर्गीकरण करण्यात येऊ नये, यासह इतर प्रमुख मागण्या त्यांनी केल्यात. यावेळी उपोषणकर्ते विकास लहाने यांच्यासह प्रमोद खरात, बंडु सुरडकर, दादाराव लहाने, अॅड. योगेश गाडगे, अण्णासाहेब चितेकर, सिध्दार्थ पवार, आनंद म्हस्के, फकीरा काकडे, प्रदिप ढील्पे, अॅड. सुधाकर जाधव, विष्णु रौंदळे, राहुल खरात यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.