रामनगर (वार्ताहार) – जालना तालुक्यातील मौजपुरी येथील विलास नारायण सावंत यांची भारतीय सैन्य दलात नुकतीच निवड झाली.या निवडीबद्दल मौजपुरी ग्रामस्थांनी गावातून ढोल ताशाचा गजरात गुलाल उधळत भव्य मिरवणूक काढून विलास सावंत यांचा सत्कार केला.
या निवडीबद्दल त्यांचे सरपंच बद्रीनारायण भसांडे,उपसरपंच सत्यनारायण ढोकळे, माजी सरपंच निवृत्तीराव गायकवाड, माजी सरपंच सिध्दार्थ मोरे, पत्रकार अच्युत मोरे, सोपानराव मिठे,भगवान ढोकळे, भागवत बळप, सोनाभाऊ खडेकर, पंडित बळप, बळीराम गायकवाड, मधुकर काळे, बबनराव मोरे, सुरेश ढोकळे,बालाजी बळप, सुंदर गायकवाड, विठ्ठल डोंगरे, बाळाभाऊ लोकरे, रामदास गायकवाड, मनोहर डोंगरे, विष्णू गायकवाड, गणेश डोंगरे, कृष्णा सावंत,गणेश काळे, राम मुळे, निवृत्ती काळे,कैलास सावंत, पवन काळे,लक्ष्मण सावंत यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.