जालना – उमा कंपनीतुन लोखंडी सळ्या घेवुन बाहेर पडत असलेल्या ट्रकचालकास रस्ता दाखविण्यासाठी ईस्पात कंपनीसमोर थांबलेल्या ट्रक चालकास बुधवारी राञी 8.30 वाजता अज्ञात 3 बॉन्सर कडुन लोखंडी पाईप आणि रॉड ने प्राणघातक हल्ला चढविण्यात आल्याची घटना घडली. यामध्ये ट्रक चालक तरुणाच्या डोक्यास गंभीर दुखापत झालीय. या प्रकरणी चंदनझीरा पोलीस ठाण्यात मारहाण करणार्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती गुरुवार दि. 26 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता पोलीस सुत्रांनी दिली. दरम्यान डोक्याला गंभीर दुखापत झाली असतांना ही चंदनझिरा पोलीसांनी साधारण गुन्हा दाखल केल्याचा आरोप जख्मीच्या नातेवाईकांनी केलाय.
या प्रकरणी दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की, सलिम खान हारुन खान हा आपली ट्रक क्रमाक एमएच-14 सिपी-3442 मध्ये उमा स्टीलमधुन लोखंडी सळ्या भरुन चालकास पाठीमागुन येण्याचे सांगितले, व सलिम हा आरटीओचे लोकेशन घेण्यासाठी पुढे येवुन ईस्पात कंपनी जवळ मोटार सायकल सह थांबला होता, यावेळी तिघा अनोळखी व्यक्तींनी सलिम ला तु येथे का थांबला असे म्हणत लोखंडी पाईप ने डोक्यावर वार केला व अन्य लोकांनी लाथा बुक्यांनी मारहाण केली. या प्रकरणी चंदनझिरा पोलीसांनी प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्या ऐवजी किरकोळ स्वरुपाच्या कलमान्वये गुन्हा दाखल केल्याचा आरोप सलिम च्या नातेवाईकांनी केला असुन जख्मी सलिम वर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे. तर या प्रकरणी अमंलदार मनसुख वेताळ हे तपास करत आहे.