जालना शहरातील बस स्थानक परिसरात असलेल्या राजहंस ट्रॅव्हल्सच्या ऑफसवर काम पाहणार्या एकाला विळ्याने मारहाण केल्याची घटना दि. 26 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 3 वाजता घडली. या प्रकरणी शुक्रवार दि. 27 सप्टेंबर 2024 रोजी मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास मारहाण करणार्यावर सदरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
या प्रकरणी विशाल कैलास सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की, ते राजहंस ट्रॅव्हल्स च्या ऑफीसवर असतांना त्यांच्या ओळखीचा व राजविर ट्रॅव्हल्स ऑफीसचे काम पाहणारा दिपक कातकडे रा. सोमनाथ जळगाव ता. जि.जालना हा आला. आणि मी नसतांना ऑफीसवर का आला होता अशी विचारणा करुन विशाल सोनवणे यांना विळ्याने मारहाण करुन जखमी केले. ही घटना घडत असतांना फिर्यादीच्या मावस भावाने मारहाण करणार्याला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो पळून जाण्यात यशस्वी झाल्याचंही फिर्यादीत म्हटलंय. या मारहाणीत विशाल सोनवणे हे जखमी झाले असून त्यांच्यावर शहरातील एका खाजगी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत. या प्रकरणी मारहाण करणार्यावर सदरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.