जालना तालुक्यातील पोकळवडगाव येथील नामदेव पाखरे यांना त्यांच्या बहिणीने आणि त्यांच्या मेहुन्याने पत्राचे पाणी दारासमारे का येते या कारणावरुन मारहाण केल्याची घटना दि. 27 सप्टेंब 2024 रोजी सायंकाळी 6.30 वाजता घडली. या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात मारहाण करणार्या बहिणीसह मेहुण्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती शनिवार दि. 28 सप्टेंब 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता पोलीस सुत्रांनी दिली.
या संदर्भात नामदेव पाखरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की, ते सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास घरीत असतांना त्यांची बहिण सविता माताडे आणि मेहुणे अर्जुन माताडे यांनी पत्राचे पाणी घरासमोरुन जात असल्याच्या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्कांने मारहाण केली. त्यानंतर त्यांचा मेहुना अर्जुन माताडे याने त्याच्या हातातील काठीने डोक्यात मारुन रक्त काढलं असल्याचं तक्रारीत म्हटलंय. या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात मारहाण करणार्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.